Google मुख्यपृष्ठ
Google बद्दल
मदत केंद्र
शोधा ची मूलतत्वे
प्रगत शोध
शोध परिणाम पृष्ठ
प्राथमिकतेनुसार सेटिंग

शोध वैशिष्ट्ये
शब्दलेखन तपासक, शेअरचे बाजारभाव आणि आणखी
सेवा व साधने
लोकल सर्च, प्रॉडक्ट सर्च, न्यूज आणि बरेच काही

|
 |
|
Google वेब शोधची वैशिष्ट्ये
अब्जावधि वेब पृष्ठांमध्ये सहज प्रवेश मिळवून
देण्याव्यतिरिक्त Google मध्ये अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत की जी
आपल्याला नेमके हवे तेच मिळवून देण्यास मदत करतात. एका खास
वैशिष्ट्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याच्या शीर्षकावर क्लिक करा.
| |
• बुक सर्च
|
पुस्तकांचा संपूर्ण मजकूर शोधण्यासाठी
Google चा वापर करा.
|
| |
• कॅश्ड
दुवे |
आम्ही प्रत्येक पान सूचीबद्ध करताना ते
कसे दिसत होते त्याचा हा फोटो.
|
| |
•
कॅल्क्युलेटर |
गणितातील सूत्रांचे मूल्यमापन करण्यासाठी
Google चा वापर करा.
|
| |
• चलन विनिमय |
कोणत्याही चलनाचा विनिमय सुलभतेने करा.
|
| |
• व्याख्या |
विविध ऑनलाइन स्त्रोतांद्वारे एकत्र
केलेल्या शब्दसंग्रहांमधून शब्दार्थ मिळविण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• फाइलचे
प्रकार |
PDF दस्तऐवजांसहित इतर बिगर-HTML
प्रकारच्या फाइल स्वरुपनांचा शोध घेण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• गट
|
आपल्या नियमित वेब शोध परिणामांमध्ये
Google ग्रुप्सद्वारा समाविष्ट केलेली संबंधित माहिती पहा.
|
| |
• मी
भाग्यवान |
आमचे परिणाम बाजूला ठेवून आपल्या
चौकशीसाठी आलेल्या पहिल्या वेब पृष्ठावर परत जा.
|
| |
• प्रतिमा
|
आपल्या नियमित वेब शोध परिणामांमध्ये
संबंधित प्रतिमा पहा.
|
| |
• लोकल
सर्च |
अमेरिका, ब्रिटन कॅनडामधील स्थानिक
व्यवसाय व सेवांचा शोध करा.
|
| |
• चित्रपट
|
आपल्या आसपास चालू असलेल्या चित्रपटांची
परीक्षणे व वेळा पाहण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• संगीत
शोध |
संगीतासंबंधी विस्तृत माहितीमध्ये त्वरित
प्रवेश मिळविण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• बातम्यांचे
मथळे |
संबंधित नवीनतम बातम्यांमुळे आपल्या शोध
परिणामांची गुणवत्ता वाढवा. .
|
| |
• फोनबुक |
अमेरिकेतील पत्ते व दूरध्वनी क्रमांक
पहा.
|
| |
• उत्पादन
शोध |
ऑनलाइन विक्रीसाठी असलेले उत्पादन
शोधण्यासाठी Google उत्पादन शोधचा वापर करा.
|
| |
• प्रश्न व
उत्तरे |
सरळ सोप्या प्रश्नांची त्वरित उत्तरे
मिळविण्यासाठी Google चा वापर करा
|
| |
• आपला
शोध अचूक करा - नवीन!
|
आपल्या शोधपरिणामांना स्पष्ट
दर्शविण्यासाठी आणि त्यामध्ये सुधार करण्यासाठी त्यात त्वरित माहिती
देणारे व विशिष्ट विषयांशी संबंधित दुवे जोडा.
|
| |
• परिणामांची पूर्वप्राप्ती |
फायरफॉक्समध्ये शोध आणखी गतिमान करते..
|
| |
• संख्येच्या मार्फत शोध . |
पॅकेज ट्रॅकिंगविषयक माहिती, अमेरिकन
पेटंट व इतर अनेक प्रकारच्या ऑंनलाइन डाटाबेसमध्ये प्रवेशासाठी Google चा
वापर करा.
|
| |
• तत्सम
पृष्ठे |
विशिष्ट परिणामांशी संबंधित पृष्ठे सादर
करा.
|
| |
• साईट शोध |
तुमचा शोध एखाद्या विशिष्ट साईटपुरता
मर्यादित ठेवा.
|
| |
• शब्दलेखन
तपासक |
विचारलेल्या शब्दांसाठी पर्यायी शब्दलेखन
सुचविते.
|
| |
• शेअर व
फंडांचे बाजारभाव |
शेअर व म्युच्युअल फंडांचे अद्ययावत
बाजारभाव व माहिती मिळविण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• रस्त्यांचे
नकाशे |
अमेरिकेतील रस्त्यांचे नकाशे
मिळविण्यासाठी Google चा वापर करा.
|
| |
• प्रवासाविषयी माहिती |
अमेरिकेतील विमान कंपनीच्या विमान
उड्डाणाची परिस्थिती तपासून पहा अगर विमानतळावरील विलंब आणि हवामानविषयक
माहिती जाणून घ्या.
|
| |
• हवामान
|
अमेरिकेतील कोणत्याही ठिकाणचे तत्कालीन
हवामान व हवामानाचा अंदाज जाणून घ्या.
|
| |
• वेब पृष्ठाचे भाषांतर |
आपल्याला इतर भाषांमधील वेब पृष्ठांमध्ये
प्रवेश करुन देते.
|
| |
• आपल्याशी कोण दुवा जोडत
आहे? |
एखादे विशिष्ट URL सूचित करणारी पृष्ठे
पहा.
|
![]() |
 |
संपूर्ण विश्वाची माहिती ऑनलाइनवर उपलब्ध
करविणासाठी पुस्तकेच ऑनलाइनवर आणून Google आपले सहाय्य करते. जेव्हा
आपल्या विषयाशी मिळता-जुळता मजकूर आमच्या Google बुक च्या अनुक्रमणिकेतील
पुस्तकांमध्ये असेल, तेव्हा आपल्या शोध परिणाम पृष्ठाच्या वरच्या बाजूला
पुस्तक परिणामांच्या खाली ते दुवे आपणास आढळतील. कोणत्याही पुस्तकाच्या
शीर्षकावर क्लिक केल्यानंतर त्या पुस्तकातील आपल्या शोधविषयांशी संबंधित
पृष्ठ, तसेच पुस्तकाचे शीर्षकासंबंधी माहिती आपणास मिळेल. "Buy this Book"
अंतर्गत कोणत्याही एका दुव्यावर क्लिक केल्यास आपण सरळ ते पुस्तक ऑनलाइन
विकणार्या पुस्तकाच्या दुकानात पोहोचाल. |
Google वेबमधून जाताना परीक्षण केलेल्या
प्रत्येक पानाचा फोटो घेते व मूळ पान उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत बॅकअप
म्हणून वापरण्यासाठी ते जतन करुन ठेवते.. आपण "कॅश्ड" दुव्यावर क्लिक
केल्यास आम्ही ते पान सूचीबद्ध करताना ते जसे दिसत होते तसे ते दिसेल.
संबंधित मजकूर आपल्या चौकशीशी मिळता-जुळता आहे हे ठरविण्यासाठी Google या
संग्रहित मजकुराचा उपयोग करते.
जेव्हा हे संग्रहित पान सादर केले जाते, तेव्हा
त्याच्या वरच्या बाजूला रीमाईंडर स्वरुपात एक वाक्य असते की ही त्या
पानाची सर्वात अद्ययावत आवृत्ती असेलच असे नाही. आपले पृष्ठ का संबंधित
आहे हे आपल्या सहज लक्षात यावे याकरिता संग्रहित आवृत्तीमधील तुमच्या
चौकशीशी जुळणारे शब्दप्रयोग हायलाइट केले जातात.
ज्या साईट सूचीबद्ध केलेल्या नाहीत तसेच ज्या
साईट धारकांनी आम्ही त्यांचा मजकूर संग्रहित करु नये अशी विनंती केली असेल
अशा साईटवर "कॅश्ड" दुवा आढळणार नाही.
|
Google
... आमच्याकडे जाहिरात करा -
व्यावसायिक समस्योत्तरे - सेवा व साधने - नोकर्या,
मुद्रित माध्यमे, व मदत ?2004 Google - 4,285,199,774 वेब
पृष्ठांचा शोध.
www.google.com/ - 3k - Nov 26,
2004 - ? कॅश्ड
?
- तत्सम पृष्ठे
|
 |
Google च्या अंगभूत कॅल्क्युलेटर
कार्याचा वापर करण्यासाठी फक्त Google शोध चौकटीत हवे ते गणित समाविष्ट
करुन एंटरचे बटण दाबा किंवा क्लिक करा. हा कॅल्क्युलेटर साधे अंकगणित,
अत्यधिक क्लिष्ट गणिते, वजनमापे व त्यांची रुपांतरे आणि स्थिर संख्यांची
गणिते सोडवू शकतो. खालीलपैकी एक उदाहरण सोडविण्याचा प्रयत्न करा, किंवा
आपलाच एक कॅल्क्युलेटर बनविण्यासाठी मदतीसाठी आमच्या संपूर्ण सूचना वाचा. |
ही उदाहरणे या नवीन वैशिष्ट्याची उपयोगिता व
शक्ती प्रदर्शित करतात.
आमच्या अंगभूत चलन विनिमय कार्याचा वापर
करण्यासाठी Google शोध चौकटीमध्ये फक्त हवा तो विनिमय समाविष्ट करुन
एंटरचे बटण दाबा किंवा क्लिक करा.
येथे काही उदाहरणे दिली आहेत:
एखाद्या शब्दाची किंवा शब्दसमूहाची व्याख्या
पाहण्यासाठी फक्त "define" या शब्दापुढे एक मोकळी जागा सोडून व मग ज्याची
व्याख्या हवी तो शब्द/शब्दसमूह टाईप करा. Google ने जर त्या
शब्द/शब्दसमूहाची व्याख्या वेबवर पाहिली असेल तर ते ती माहिती काढून
आपल्या शोध परिणामांच्या सर्वात वरच्या बाजूला प्रदर्शित करते.
आपण "define:" हा विशेष कर्ता समाविष्ट
करुन व्याख्यांची यादीही मिळवू शकता. तो व आपल्याला व्याख्या हवा असलेला
शब्द यामध्ये मोकळी जागा न सोडता. उदहरणार्थ, [define:World
Wide Web] हा शोध तुम्हाला "वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध ऑनलाइन
स्त्रोतांकडून एकत्र केलेल्या व्याख्यांची यादी दाखवितो.
Google ने बिगर-HTML फाइल प्रकारांची शोधलेली
संख्या 12 फाइल स्वरुपनांपर्यंत विस्तारली आहे. PDF दस्तऐवजांखेरीज Google
आता Microsoft Office, PostScript, Corel WordPerfect, Lotus 1-2-3, व इतर
स्वरुपानांच्या फाइलीही शोधू शकते. हे नवे फाइल प्रकार वापरकर्त्याच्या
चौकशीशी संबंधित असतील तेव्हाच ते Google शोध परिणामांमध्ये दिसून येतील.
Google वापरकर्त्याला "व्ह्यू ऍज HTML" ची
क्षमतादेखील उपलब्ध करविते, ज्यामुळे वापरकर्ता विशिष्ट ऍप्लिकेशनचे अभावी
देखील संबंधित फाइलमधील मजकूर जाणून घेऊ शकतो.. "व्ह्यू ऍज HTML" हा
पर्याय वापरकर्त्याला विशिष्ट फाइल स्वरुपनांद्वारा कधी कधी होणार्या
व्हायरसच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवतो.
एकूणच, ही अतिरिक्त फाइल स्वरुपने Google च्या
वापरकर्त्याला वर्ल्ड वाईड वेब वर उपलब्ध असलेली माहिती अधिक विस्तृत
प्रमाणात दाखवितात. आणि यथाकाल फाइल स्वरुपनांचे प्रकारात आणखी वृद्धि
करण्याची Google ची योजना आहे.
या वैशिष्ट्यासंबंधी अधिक माहितीसाठी कृपया FAQ हा फाइल प्रकार वाचा.
|
? [PDF] ? शोध संयंत्राची अंतर्रचना
फाइल स्वरुपन:
PDF/Adobe Acrobat - ? व्ह्यू
ऍज HTML ?
... दुसरे असे की, Google काही दृश्य
सादरीकरणांचा तपशीलवार मागोवा ठेवते जसे फाँट... दूरध्वनी
क्रमांक, उत्पादन क्रमांक), स्वरुपनाचा प्रकार (टेक्स्ट, HTML, PDF,
प्रतिमा, ध्वनी ...
www-db.stanford.edu/pub/papers/google.pdf
- तत्सम
पृष्ठे
|
आपल्याला जर विशिष्ट फाइल प्रकारातील विशिष्ट
परिणाम पहायचे असतील (उदाहरणार्थ, PDF दुवे), तर फक्त आपल्या शोध चौकटीत
शोधण्याच्या गोष्टींबरोबर filetype:[एक्सटेंन्शन] टाईप करा
(उदाहरणार्थ, filetype:pdf) .
 |
Google वापरुन आपण उत्पादनांचा शोध घेत
असाल, तर आपल्याला संबंधित उत्पादन शोधाची माहिती व दुवे तुमच्या शोध
परिणामांच्या वरच्या बाजूला दिसू शकतात. हे उत्पादन शोध परिणाम प्रॉडक्ट
सर्च या Google च्या उत्पादन शोध सेवेत सहभागी असलेल्या व्यापार्यांच्या
साईटशी जोडलेले असतात. हे परिणाम म्हणजे जाहिराती नसतात, कारण
व्यापार्यांकरिता प्रॉडक्ट सर्च मधील सहभाग पूर्णतः विनामूल्य आहे. |
 |
Google वर जेव्हा आपण शोध घेता, तेव्हा
कधी कधी आपल्या शोध परिणामांच्या पृष्ठाच्या खालच्या बाजूला Google
ग्रुप्स चे परिणाम आढळतील. हे वापरकर्त्यांनी एखाद्या चर्चा गटाला तुमच्या
शोधाशी संबंधित एखाद्या विषयाबद्दल पाठवलेले संदेश असतात. यापैकी एखाद्या
परिणामावर क्लिक केल्यास आपल्याला Google ग्रुप्स साईटवरील संदेशाचा पूर्ण
मजकूर प्राप्त होईल. |
"मी भाग्यवान" हे बटण आपल्याला थेट Google ने
आपल्या चौकशीला उत्तर म्हणून पाठवलेल्या पहिल्या वेब पृष्ठावर घेऊन जाते.
आपण इतर शोध परिणाम मुळीच पाहू शकणार नाही. "मी भाग्यवान" शोध म्हणजे आपण
वेब पृष्ठे शोधण्याकरिता कमी वेळ घालवा व ती वाचण्यात जास्त वेळ घालवा.
उदाहरणार्थ, पुणे विद्यापीठाचे मुख्यपृष्ठ
शोधण्यासाठी शोध चौकटीत फक्त puneuniversity एवढेच समाविष्ट करा व "मी
भाग्यवान" बटणावर क्लिक करा. Google आपल्याला थेट विद्यापीठाचे मुख्यपृष्ठ
असलेल्या "www.unipune.ernet.in" वर नेते.
आपण भाग्यवान आहात?
कधी कधी आपल्याला Google च्या शोध परिणामांच्या
वरच्या बाजूला छोट्या प्रतिमा आढळतील. आमच्या मते या प्रतिमा आपल्या शोध
अटींशी संबंधित असतात.
Google प्रतिमा शोध करुन किंवा आपल्या शोध अटींमध्ये 'pics' वा 'pictures'
असे शब्द घालूनही आपण योग्य त्या प्रतिमा नियमित वेब शोधाचे दरम्यान मिळवू
शकता.
 |
Google द्वारा आपण एका विशिष्ट भागातील
नेमकी दुकाने व व्यवसाय शोधू शकता. आपल्या शोधात शहराचे नाव अगर झिप कोड
समाविष्ट केला की Google एका नकाशावर त्या भागातील परिणाम दर्शविते,
ज्याबरोबर आपल्या शोध परिणामांच्या वरच्या बाजूला अधिक माहिती, दिशा व
सर्वेक्षणे यांचे दुवे असतात. |
 |
आपल्या जवळपास चालू असलेल्या चित्रपटांची
परीक्षणे व वेळा पाहण्यास Google च्या शोध चौकटीत "movies", "showtimes"
अगर एखाद्या चालू चित्रपटाचे नाव टाईप करा. Google Local वापरुन आपण आधीच
स्थान जतन केले असल्यास, सर्वात वरच्या परिणामात आपल्याला निवडलेल्या
चित्रपटाच्या जवळच्या चित्रपटगृहातील वेळा दिसतील. |
अपल्या आसपास चालू असलेल्या एखाद्या चित्रपटाची
चित्रपटगृहे व खेळाच्या वेळा पाहण्यास फक्त त्या चित्रपटाचे नाव शोधा.
चित्रपटाचे नाव आठवत नाही, का फक्त काही तरी नवीन
पाहायचे आहे? आपण "movie:" हा कर्ता वापरुन विशिष्ट अभिनेता, दिग्दर्शक वा
कथानकाशी संबंधित चित्रपट शोधू शकता.
मिळालेल्या चित्रपटांविषयी वाचायचे आहे? आपल्या
कोणत्याही चित्रपटाच्या शोध परिणामांमध्ये 5 तार्यांपैकी सरासरी श्रेणी व
परीक्षणांच्या दुव्यांसह ऑनलाइन परीक्षणांमधील काही भागांचा समावेश असेल.
या चित्रपटांच्या ऑनलाइन परीक्षणांच्या संपूर्ण यादीसाठी कोणत्याही
शीर्षकाजवळच्या "परीक्षणे" या दुव्यावर क्लिक करा.
| आपल्याला हवे ते संगीत विकत घेण्यासाठी
कलाकार, गीते, अल्बम व संगीत विकत घेण्याच्या ठिकाणांची माहिती मिळवा. आपण
अमेरिकेतील एखाद्या लोकप्रिय कलाकाराचे नाव शोध चौकटीत समाविष्ट केल्यास
आपल्या शोध परिणामांच्या वरच्या बाजूला आम्ही त्या कलाकाराशी संबंधित
वापरकर्त्यांची परीक्षणे, गीतांची शीर्षके, संगीत विकत घेण्याची दुकाने व
त्या कलाकाराशी संबंधित इतर उपयुक्त माहिती दर्शवितो. |
|
Pixies
Albums: Doolittle, Surfer Rosa Albums: ,
Doolittle, Surfer Rosa, Pixies Pixies ,and more... and more...
Songs: Debaser, Wave of Mutilation, Silver,
and more... Songs: Debaser, Wave of Mutilation, Silver, and more... |
| आणखी संगीत परिणाम Pixies
साठी |
त्या कलाकाराशी संबंधित अल्बम्स, गीते, आणि
संगीतविषयक अधिक माहितीसाठी या दुव्यावर क्लिक करा.
 |
Google वर शोध घेताना आपणास आपल्या शोध
परिणामांच्या वरच्या बाजूला "बातम्या" या नावाचे दुवे दिसू शकतील. हे दुवे
आपल्याला Google सतत लक्ष ठेवून असलेल्या वृत्तसेवांकडून आलेल्या
वृत्तांतांशी जोडतात. जर आपण समाविष्ट केलेले शब्दप्रयोग ताज्या
बातम्यांमध्ये असतील तर हे दुवे दिसतात आणि त्यांचेवर क्लिक केल्यास आपण
थेट त्या वृत्तसेवांकडे जाता. |
 |
आमच्या शोध चौकटीतून मिळणार्या माहितीत
Google ने अमेरिकेतील पत्ते व दूरध्वनी क्रमांक पाहण्याची सुविधा समाविष्ट
केली आहे. विशिष्ट प्रकारचे कळीचे शब्द वापरुन केलेल्या शोध परिणामांच्या
पृष्ठांवर सर्वात वरच्या बाजूला आपणास सार्वजनिकरित्या सूचीबद्ध केलेले
पत्ते व दूरध्वनी क्रमांक दिसतील. |
एखाद्या अमेरिकन घराची माहिती,
मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणतेही शब्दगट Google च्या शोध चौकटीत समाविष्ट
करा:
- नाव (किंवा आद्याक्षर), आडनाव, शहर
(राज्याचे नाव ऐच्छिक)
- नाव (किंवा आद्याक्षर), आडनाव, राज्य
- नाव (किंवा आद्याक्षर), आडनाव,प्रदेशाचा कोड
- नाव (किंवा आद्याक्षर), आडनाव,झिप कोड
- प्रदेशाच्या कोडसहित दूरध्वनी क्रमांक
- आडनाव, शहर, राज्य
- lआडनाव,झिप कोड
Google फोनबुक मधून आपल्या घरचा दूरध्वनी व
पत्ता काढून टाकण्यासाठी, येथे क्लिक करा.
| जपानची लोकसंख्या किती हे जाणून घ्यायचे
आहे? अल्जेरियामध्ये कोणते चलन वापरतात? बोनोचे जन्मस्थान? सत्याधारित
प्रश्न अगर शंका (जसे "population of Japan") आम्हाला Google च्या शोध
चौकटीत टाईप करुन विचारा. आम्ही वेब वर शोधून त्याचे उत्तर आपल्या शोध
परिणामांच्या पृष्ठावर सर्वात वर प्रदर्शित करु. आपल्याला अधिक माहिती
मिळावी म्हणून आम्ही आमच्या स्त्रोताच्याही संपर्कात असतो. |
काही विशिष्ट विषयांतर्गत शोधांसाठी
आपल्याला आपल्या शोध परिणामांच्या पृष्ठावर सर्वात वरच्या बाजूला दुवे
आढळतील, ते आपला शोध त्वरित पूर्ण करतात.
हे दुवे म्हणजे लेबले आहेत जी काही
वेबपृष्ठांना दिलेली आहेत. संघटना, व्यवसाय व व्यक्ती त्यांना उत्कृष्टपणे
माहित असलेल्या विषयांमधील साईटना लेबले देऊ शकतात. Google को-ऑपरेटिव्ह
डिरेक्टरीला भेट देऊन आपण अशा आणखी दात्यांशी संपर्क साधू शकता.
Google को-ऑपरेटिव्ह
डिरेक्टरी मध्ये अंशदानित दुव्यांचा समावेश असतो, जे आपल्या शोध
परिणामांना त्वरित माहिती पुरवितात - जसे हॉटेलमधील आरक्षण, अर्थविषयक
माहिती, किंवा अगदी प्रसिद्ध व्यक्तींबद्दलच्या चटपटीत गप्पासुद्धा.
आपल्या पसंतीच्या दात्यांना अंशदान करुन या सेवांचा समावेश आपल्या Google
शोधात करा.
|
काही शोधांमध्ये Google आपोआपच आपल्या ब्राउझरला
आपण क्लिक करण्यापूर्वीच सर्वात वरचा शोध परिणाम डाऊनलोड करण्यास सांगते.
आपण वरच्या शोध परिणामावर क्लिक केल्यास ते गंतव्य पृष्ठ पहिल्यापेक्षा
वेगाने लोड होते.
Google या कार्याकरिता फायरफॉक्स व मॉझिला वेब
ब्राउझरमधील एक खास
पूर्वप्राप्तीचे वैशिष्ट्य वापरते, त्यामुळे इंटरनेट एक्स्प्लोअरर
किंवा इतर वेब ब्राउझरमध्ये परिणामांची पूर्वप्राप्ती उपलब्ध नाही. आपण
आपल्या वेब ब्राउझर प्राथमिकतांमध्ये मॉझिला
प्रीफेचिंग FAQ मध्ये सांगितल्यानुसार पूर्वप्राप्ती अकार्यक्षम करु
शकता. फायरफॉक्समध्ये आपण खालीलप्रमाणे पूर्वप्राप्ती अकार्यक्षम करु शकता:
- उद्देशन पट्टीमध्ये "about:config" टाईप
करा.
- "network.prefetch-next" या सेटिंग पर्यंत स्क्रोल करत खाली
या व मूल्य "False" असे सेट करा.
पूर्वप्राप्ती कार्यक्षम असल्यामुळे आपण क्लिक न
केलेल्या साईटमधून आपल्या ब्राउझरच्या संग्रहामध्ये कूकीज व वेब पृष्ठे
आलेली असतील, कारण आपण Google शोध परिणामांची पृष्ठे पाहता तेव्हा
पूर्वप्राप्ती आपोआप होते. आपल्या ब्राउझरमधील संग्रह व कूकीज काढून टाकून
तुम्ही या फाईल्स काढू शकता.
आपण वेब सर्व्हर चालवला तर आमच्या वेबमास्टर FAQ मध्ये या
वैशिष्ट्याबद्दल वेबमास्टर-विशिष्ट माहिती आपल्याला मिळेल.
Google च्या शोध चौकटीत पार्सलचा मागोवा घेणारे
क्रमांक, पेटंट व इतर विशेष क्रमांक समाविष्ट करुन त्यांचेबद्दलची माहिती
त्वरित मिळविता येते. उदाहरणार्थ, FedEx चा मागोवा घेणारा क्रमांक टाईप
केल्यास आपल्या पार्सलबद्दल ताजी माहिती मिळेल. इतर काही संख्येमार्फत
विशेष शोध प्रकार असे आहेत:
| • |
UPS चा मागोवा घेणारे क्रमांक |
उदाहरणार्थ शोध: "1Z9999W99999999999" |
| • |
FedEx चा मागोवा घेणारे क्रमांक |
उदाहरणार्थ शोध:
"999999999999"
|
| • |
USPS चा मागोवा घेणारे क्रमांक
|
उदाहरणार्थ शोध: "9999 9999 9999 9999
9999 99" |
| • |
वाहन ओळख (VIN) क्रमांक |
उदाहरणार्थ शोध: "AAAAA999A9AA99999" |
| • |
UPC कोड |
उदाहरणार्थ शोध: "073333531084" |
| • |
दूरध्वनी प्रदेश कोड |
उदाहरणार्थ शोध: "650" |
| • |
पेटंट क्रमांक |
उदाहरणार्थ
शोध: "patent 5123123"
आपल्या पेटंट क्रमांकापूर्वी "patent" हा शब्द घालण्याचे
लक्षात ठेवा. |
Google ने शोध करावा असे इतर काही क्रमांकप्रकार
आहेत काय? कृपया आमच्याशी
संपर्क साधा.
जेव्हा आपण शोध परिणामासाठी "तत्सम पृष्ठे" या
दुव्यावर क्लिक करता, तेव्हा Google आपोआपच या परिणामाशी संबंधित
पृष्ठांसाठी वेबवर शोध घेते.
तत्सम पृष्ठे हे वैशिष्ट्य अनेक उद्देशांसाठी
वापरता येते. आपल्याला एखाद्या विशिष्ट साईटवरील माहिती आवडली, पण त्यात
अजून काही हवे आहे असे वाटत असेल, तर तत्सम पृष्ठे हे वैशिष्ट्य समान
माहिती असलेल्या, आपल्याला अपरिचित साईट शोधू शकते. आपण उत्पादनांविषयी
माहिती पाहत असाल तर तत्सम पृष्ठे हे वैशिष्ट्य स्पर्धात्मक माहिती काढू
शकते, ज्यामुळे आपण थेट तुलना करु शकता. आपण एखाद्या विशिष्ट क्षेत्रात
संशोधन करु इच्छित असल्यास तत्सम पृष्ठे हे वैशिष्ट्य आपल्याला योग्य
सांकेतिक शब्द शोधण्याचा त्रास न देता त्वरित विस्तृत प्रमाणात स्त्रोत
शोधण्यास मदत करु शकते.
एखादे पृष्ठ जितके अधिक विशिष्टीकृत असेल तेवढे
कमी परिणाम Google आपल्याला शोधून देऊ शकते. उदाहरणार्थ, तत्सम पृष्ठे या
वैशिष्ट्याकडे जर आपल्या वैयक्तिक मुख्यपृष्ठाशी इतर पृष्ठे जोडण्याइतकी
पुरेशी माहिती नसेल तर ते त्याच्याशी संबंधित पृष्ठे शोधू शकणार नाही.
तसेच कंपन्या जर त्यांच्या पृष्ठांसाठी अनेक URL (जसे company.com व
www.company.com) वापरत असतील् तर तत्सम पृष्ठे या वैशिष्ट्याकडे एका URL
बद्दल फारच कमी माहिती असू शकते, तर दुसर्याबद्दल भरपूर माहिती असू शकते.
पण साधारणपणे तत्सम पृष्ठे हे वैशिष्ट्य बहुतांश वेब पृष्ठांसाठी चांगले
काम करते.
|
Google
... आमच्याकडे जाहिरात करा -
बिझिनेस सोल्युशंस - सर्व्हिसेस ऍंड टूल्से - जॉब्स,
प्रेस एँड हेल्प ?2004 Google - 4,285,199,774 वेब पृष्ठांचा शोध.
www.google.com/ - 3k - मार्च
26, 2004 - कॅश्ड
- ?
तत्सम पृष्ठे ?
|
"site" या शब्दानंतर विसर्ग दिल्याने आपण आपला
शोध एका विशिष्ट साईटपुरता मर्यादित ठेवू शकता. असे करण्यासाठी site:sampledomain.com
ची वाक्यरचना Google च्या शोध चौकटीत वापरा. उदाहरणार्थ, स्टॅनफोर्डच्या
साईटवर प्रवेशासंबंधी माहिती शोधण्यासाठी समाविष्ट करा:
Google चे शब्दलेखन तपासणारे सॉफ्टवेअर आपोआपच
आपली चौकशी पाहून एखाद्या शब्दाचे सर्वाधिक प्रचलित शब्दलेखन आपण वापरता
आहात का ते तपासते. पर्यायी शब्दलेखन वापरुन आपल्याला आणखी यथार्थ शोध
परिणाम मिळू शकतील असे त्यास वाटले तर ते विचारेल: "आपल्याला असे म्हणायचे
होते का: (अधिक प्रचलित शब्दलेखन)?". सूचित शब्दलेखनावर क्लिक केले की
त्या शब्दासंबंधी Google शोध सुरू होतो. Google ची शब्दलेखन तपासणी
इंटरनेटवरील सर्व शब्दांच्या पुनरावृत्तींवर आधारित असल्याने ते
विशेषनामांची सर्वात प्रचलित शब्दलेखने सुचवू शकते, जी एखाद्या साध्या
शब्दलेखन तपासणार्या सॉफ्टवेअरमध्ये अगर शब्दकोशात असतीलच असे नाही.
शेअर व म्युच्युअल फंडांचे बाजारभाव जाणण्यासाठी
Google वापरायचे तर फक्त शोध चौकटीत संकेतचिन्ह समाविष्ट करा
Google अर्थ कडून अधिक संबंधित माहिती
पाहण्यासाठी चार्टवर किंवा Google अर्थ दुव्यावर क्लिक करा. किंवा, उपलब्ध
दुव्यांवर क्लिक करुन आपण इतर अर्थविषयक माहितीदात्यांकडेही थेट जाऊ शकता.
हे अर्थविषयक माहितीदाते स्वतंत्र मूल्यमापक प्रतिष्ठानांद्वारा निवडून
लोकप्रियतेच्या आधारावर क्रम लावलेले असतात. शिवाय आम्ही डाऊनलोडचा वेग,
वापरकर्त्यांशी सन्मुखता व कार्यक्षमता इ. महत्त्वपूर्ण गुणवत्ता
घटकांचाही विचार करतो. जर आम्ही समाविष्ट करावा असा माहितीदाता आपल्याला
सूचित करायचा असेल तर कृपया आमच्याशी
संपर्क साधा.
 |
रस्त्यांचे नकाशे शोधण्यासाठी Google चा
वापर करायचा असेल तर झिप कोड वा शहर/राज्यासहित अमेरिकेतील एखादा
रस्त्याचा पत्ता Google च्या शोध चौकटीत समाविष्ट करा (उदा. 165
University Ave Palo Alto CA). अनेकदा रस्त्याचा पत्ता व शहराचे नाव
पुरेसे असते.
|
आपली चौकशी म्हणजे नकाशासाठी विनंती आहे असे
जेव्हा Google ओळखते, तेव्हा आम्ही आपल्याला आपला पत्ता Google च्या
नकाशावर दाखवतो व आपल्याला तेथे जाण्याच्या सूचना मिळवून देऊन आपले
नित्यस्थितीतील स्थान संग्रहित करतो.
एखाद्या विमानतळावरील विलंब व हवामान परिस्थिती
पाहण्यासाठी त्या विमानतळाचे तीन अक्षरी सांकेतिक नाव व त्यापुढे
"airport" हा शब्द टाईप करा. उदाहरणार्थ, सॅन फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय
विमानतळाबद्दलची ताजी महिती "sfo airport" चा शोध घेऊन पाहता येतील.
एखाद्या अमेरिकन उड्डाणाची परिस्थिती जाणण्यासाठी
त्या विमान कंपनीचे नाव व त्यापुढे उड्डाण क्रमांक टाईप करा. उदाहरणार्थ,
युनायटेड एअरलाइंस च्या उड्डाण क्रमांक 134 ची परिस्थिती पाहण्यासाठी
"United134" चा शोध घ्या.
|
अमेरिकेतील अगर जगातील एखाद्या ठिकाणचे
हवामान व आगामी चार दिवसांचा अंदाज पाहण्यास "हवामान" व त्यापुढे त्या
ठिकाणाचे नाव टाईप करा. साधारणपणे शहराचे नाव पुरेसे असते, पण जगातील
शहरांसाठी आपण राज्य किंवा झिप कोड अथवा देशही अंतर्भूत करु शकता.
उदाहरणार्थ, पालो अल्टोचे हवामान पाहण्यासाठी आपण " weather palo alto, ca
" किंवा " weather palo alto 94301" असा शोध करु शकता.
|
या ठिकाणचे हवामान तुमच्या वैयक्तिकृत Google
च्या मुख्यपृष्ठावर पाहावयाचे असले तर वर उजव्या कोपर्यात असलेले 'माझ्या
Google मुख्यपृष्ठात समाविष्ट करा' बटण क्लिक करुन हे करता येते.
सर्व हवामान परिस्थिती व अंदाज Weather
Underground, Inc. द्वारा पुरवले जातात.
भाषांतर या वैशिष्ट्याद्वारे Google भाषेचा अडसर दूर करते.
यांत्रिक भाषांतर तंत्रज्ञान वापरुन आपल्या भाषेखेरीज इतर भाषांमधील वेब
पृष्ठांमध्ये प्रवेश मिळविण्याची क्षमता Google आपल्याला देते. सध्या
Google खालील भाषांतराच्या जोड्या देते: इंग्रजीमधून व इंग्रजीमध्ये अरबी,
चिनी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, कोरियन, जपानी, स्पॅनिश व पोर्तुगीज, आणि
जर्मनमधून व जर्मनमध्ये फ्रेंच.
आपल्या शोध परिणामांमध्ये यापैकी एका भाषेतील पान असेल व आम्ही
आपल्या भाषांतर जोडीला समर्थन देत असू तर एका क्लिकने आपण ते पृष्ठ आपल्या
भाषेत भाषांतरित करु शकता.
या वैशिष्ट्याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भाषांतर FAQ वाचा.
काही शब्दांपुढे विसर्ग असला की त्यांचे Google
मध्ये विशिष्ट अर्थ होतात. Google मध्ये असा एक शब्द आहे link:
कर्ता. चौकशी link:siteURL ही आपल्याला अशी पृष्ठे दाखवते
जी त्या URL कडे निर्देश करतात. उदाहरणार्थ, link:www.google.com ही
आपल्याला अशी पृष्ठे दाखवते की जी Google च्या मुख्यपृष्ठाकडे निर्देश
करतात. आपण एखादी link: संयुक्त करु शकत नाही. नेहमीच्या सांकेतिक शब्द
शोधद्वारा शोध घ्या.
|