गोपनीयता धोरण

अखेरचे सुधारित: 27 जुलै 2012 (संग्रहीत आवृत्त्या पहा)

आपण आमच्या सेवा विविध प्रकारे वापरू शकता – माहिती शोधणे आणि शेअर करणे, इतर लोकांशी संवाद साधणे किंवा नवीन सामग्री तयार करणे यासाठी. आमच्‍याबरोबर माहिती शेअर करताना, उदाहरणार्थ एक Google खातेतयार करून, आपल्‍याला अधिक संबंधित शोध परिणाम आणि जाहिराती दर्शविण्‍यासाठी, आपल्‍याला लोकांसह कनेक्‍ट करण्‍यात किंवा इतरांसह शेअर करणे जलद आणि सोपे बनविण्‍यात मदत करण्‍यासाठी – आम्‍ही त्‍या सेवा चांगल्‍या सुद्धा करू शकतो. जेव्हा आपण आमच्या सेवा वापरतात, तेव्हा आम्ही आपली माहिती कशी वापरत आहोत आणि आपण आपल्या गोपनीयतेचे संरक्षण कोणत्या प्रकारे करू शकता हे आपल्याला स्पष्ट करून देऊ इच्छितो.

आमचे गोपनीयता धोरण हे स्‍पष्‍ट करते:

आम्‍ही त्‍यास शक्‍य तितके साधे ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे, परंतु आपण कुकीज, IP पत्ते, पिक्‍सेल टॅग आणि ब्राउझर, यासारख्‍या संज्ञांशी परिचित नसल्‍यास प्रथम त्‍या प्रमु्‍ख अटीं बद्दल वाचा. Google ला आपली गोपनीयता महत्‍वाची आहे म्‍हणून आपण Google शी नव्याने संबंधित असल्‍यास किंवा बर्‍याच काळापासून वापरकर्ता असल्‍यास, कृपया आमच्‍या सेवा पद्धतींविषयी जाणून घेण्‍यास वेळ घ्‍या – आणि आपल्‍याला कोणतेही प्रश्र्न असल्‍यासआमच्‍याशी संपर्क साधा.

आम्‍ही एकत्र करीत असलेली माहिती

आमच्‍या सर्व वापरकर्त्‍यांना चांगल्‍या प्रकारे सेवा प्रदान करता येण्‍यासाठी आम्‍ही माहिती एकत्रित करतो – आपण कोणती भाषा बोलता यासारख्‍या मुळ सामग्री पासून ते आपल्‍याला कोणत्‍या जाहिराती सर्वात जास्‍त उपयोगाच्‍या वाटतात किंवा ऑनलाइनवर कोणते लोक असणे महत्‍वाचे वाटते यासारख्‍या अधिक जटिल गोष्‍टींचे आकलन करणे

आम्‍ही दोन प्रकारे माहिती एकत्रित करतो:

आम्ही संकलित करत असलेली माहिती आम्ही कशी वापरतो

आमच्‍या सर्व सेवांमधून एकत्र केलेल्‍या माहितीचा वापर आम्‍ही प्रदान करणे, देखरेख करणे, संरक्षण करणे आणि त्‍यांना सुधारणे, नवीन विकसित करणे आणि Google आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे संरक्षण करणे यासाठी करतो. आम्‍ही या माहितीचा वापर आपल्‍याला अधिक संबंद्धित शोध परिणाम आणि जाहिराती देणे – यासारखी नियोजित सामग्री देण्यासाठी देखील करतो.

आपल्‍या Google प्रोफाइलसाठी आपण प्रदान केलेले नाव आम्‍ही देऊ करीत असलेल्‍या सर्व सेवा ज्‍यांना एका Google खात्‍याची आवश्‍यकता असते त्‍या सेवांमध्‍ये वापरू. या ‍व्यतिरिक्त, आम्ही आपल्या Google खात्याशी संबंधित जुनी नावे बदलु शकतो जेणेकरुन सर्व सेवांमध्‍ये आपले प्रतिनिधित्व सातत्याने केले जाईल. आपले ईमेल इतर वापरकर्त्यांकडे आधीपासूनच असल्यास किंवा आपल्याला ओळखणारी अन्य माहिती असल्यास, आम्ही त्यांना आपली सार्वजनिकपणे दृश्यमान असलेली Google प्रोफाइल माहिती दर्शवू शकतो, जसे की आपले नाव आणि फोटो.

आपण Google शी संपर्क साधता तेव्‍हा, आपल्‍याला येणार्‍या कोणत्‍याही समस्‍यांचे निराकरण करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्‍ही आपल्‍या संप्रेषणाचे रेकॉर्ड ठेवतो. आम्‍ही आपला ईमेल पत्ता आपल्‍याला आमच्‍या सेवांबद्दल जसे की आगामी बदलांविषयी किंवा सुधारणांविषयी माहिती देण्‍यास वापरू.

आम्‍ही कुकीज आणि पिक्‍सेल टॅग सारख्‍या इतर तंत्रज्ञानांमधून एकत्रित केलेल्‍या माहितीचा वापर आपला वापरकर्ता अनुभव आणि एकंदर आमच्‍या सेवांची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी करतो. उदाहरणार्थ, आपली भाषा प्राधान्ये जतन करून, आम्ही आमच्या सेवा आपण प्राधान्य देत असलेल्या भाषांमध्ये दिसून येण्यास सक्षम होऊ. आपल्‍याला नियोजित जाहिराती दाखविताना, आम्‍ही कुकी किंवा निनावी अभिज्ञापकास जात, धर्म, लैंगिक आवड किंवा आरोग्‍य यासारख्‍या संवेदनशील श्रेण्‍यांसह संबंद्ध करणार नाही.

आम्‍ही एका सेवेमधून वैयक्तिक माहिती Google च्‍या इतर सेवांच्‍या माहितीसह वैयक्तिक माहिती समाविष्‍ट करून एकत्रित करू शकतो – उदाहरणार्थ आपण ओळखत असलेल्‍या लोकांसह गोष्‍टी शेअर करणे. आमच्‍याकडे आपली निवड करण्‍याची संमती नसेपर्यंत आम्‍ही DoubleClick कुकी माहिती वैयक्तिकरित्या ओळखण्‍यायोग्‍य माहितीसह एकत्र करणार नाही.

या गोपनीयता धोरणामध्‍ये नमूद केलेल्‍या व्‍यतिरिक्त उद्दिष्‍टासाठी माहिती वापरण्‍यापूर्वी आम्‍ही आपली संमती मागू.

Google जगभरातील अनेक देशांमधील आमच्या सर्व्हरवरील वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करते. आम्‍ही आपली वैयक्तिक माहितीवर आपण रहात असलेल्‍या देशाबाहेरील सर्व्‍हरवर प्रक्रिया करू शकतो.

पारदर्शकता आणि निवड

लोकांच्या गोपनीयतेच्या धारणा भिन्न असतात. आम्ही कोणती माहिती संकलित करतो याबद्दल सुस्पष्‍ट रहाणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरुन आपल्‍याला हे कसे वापरले जाते त्य‍ाविषयी अर्थपूर्ण निवडी करता येतील. उदाहरणार्थ, आपण हे करू शकता:

आपण आपल्‍या ब्राउझरला आमच्‍या सेवांशी संबंधित असलेल्‍या कुकीजसह सर्व कुकीजना अवरोधित करण्‍यासाठी, किंवा आमच्‍याद्वारे कुकी सेट केली जात असताना ते सूचित करण्‍यासाठी सेट देखील करू शकता. तथापि, आपल्या कुकीज अक्षम झाल्या असल्यास आमच्या बर्‍याच सेवा योग्यरितीने कार्य करू शकत नाहीत हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आम्ही कदाचित आपली भाषा प्राधान्ये लक्षात ठेवू शकत नाही.

आपण शेअर केलेली माहिती

आमच्या सेवांपैकी अनेक सेवा आपल्याला इतरांसोबत माहिती शेअर करण्‍यास वाव देतात. लक्षात ठेवा की आपण जा‍हीरपणे माहिती शेअर करता तेव्हा, Google सह ती शोध इंजिनांकडून अनुक्रमपात्र असेल. सामग्री शेअर करणे आणि हटविणे याबाद्दल आमच्या सेवा आपल्याला विभिन्न पर्याय देतात.

आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करणे आणि ती अद्ययावत करणे

आपण जेव्‍हा आमच्‍या सेवांचा वापर करता, तेव्‍हा आपल्‍या वैयक्तिक माहितीमध्‍ये प्रवेश प्रदान करण्‍याचे आमचे ध्‍येय असते. ती माहिती चुकीची असल्यास, जोपर्यंत आम्हाला ती माहिती कायदेशीर ठरवण्यात आलेल्या व्यवसायासाठी किंवा कायदेशीर हेतूंसाठी राहू द्यायची आहे तोपर्यंत – आम्ही आपल्याला ती त्वरित अद्ययावत करण्याचे किंवा ती हटवण्याचे मार्ग सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आपली वैयक्तिक माहिती अद्ययावत करताना, आम्‍ही आपल्‍या विनंतीवर कृती करण्‍यापूर्वी आपल्‍याला आपली ओळख सत्‍यापित करण्‍यास सांगू शकतो.

आम्‍ही विनाकारणा पुनरूक्ति करणार्‍या, विषम तांत्रिक प्रयत्‍नांची आवश्‍यकता असणार्‍या (उदाहरणार्थ, नवीन सिस्‍टिम विकसित करणे किंवा मुळतः अस्‍तित्‍वात असलेली पद्धती बदलणे), इतरांच्‍या गोपनीयतेला जोखीम असणार्‍या, किंवा अत्‍यंत अव्यवहारी (उदाहरणार्थ, बॅकअप टेप्‍सवर असलेल्‍या माहिती संबंधित विनंत्‍या) विनंत्‍या नाकारू शकतो.

आम्‍ही माहिती प्रवेश आणि सुधारणा प्रदान करण्‍यासाठी जेथे त्‍यास विषमतोल प्रयत्‍नांची आवश्‍यकता असेल त्‍याव्‍यतिरिक्त आम्‍ही ते विनामूल्‍य प्रदान करू शकतो. आमच्‍या सेवांना माहितीचे चुकून किंवा दुर्भावनापूर्ण नाश होण्‍यापासून संरक्षण करता यावे अशा प्रकारे सेवांची देखरेख करण्‍याचे आमचे ध्‍येय आहे. केवळ यामुळेच, आपण आमच्या सेवांवरून माहिती हटवल्यानंतर, आम्ही आमच्या सक्रिय सर्व्हरवरून तातडीने अवशिष्ट कॉपी हटवू शकत नाही आणि आमच्या बॅक अप सिस्टमवरून माहिती काढूही शकत नाही.

आम्ही शेअर करीत असलेली माहिती

आम्‍ही वैयक्तिक माहिती कंपन्‍या, संस्‍था आणि Google बाहेरील व्‍यक्तींबरोबर खालीलपैकी कोणतीही एक परिस्‍थिती लागू होत नसल्‍यास शेअर करत नाही.

आम्‍ही एकत्रित केलेली वैयक्तिकरित्‍या न ओळखता येण्यायोग्य माहिती, सार्वजनिकरित्‍या आणि आमचे भागीदार – जसे प्रकाशक, जाहिरातदार किंवा कनेक्‍ट केलेल्‍या साइट यांसह शेअर करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवांच्या सामान्य वापराबद्दल ट्रेन्ड दर्शवण्यासाठी माहिती सार्वजनिकपणे शेअर करू शकतो.

जर Google विलीनीकरण, इतर व्यवसाय आपल्यात सामावून घेणे किंवा मालमत्ता विक्री यामधे गुंतलेली असल्यास, आम्ही कोणत्याही वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि वैयक्तिक माहितीचे हस्तांतरण केले जाण्यापूर्वी किंवा भिन्न गोपनीयता धोरणाच्या अधीन होण्यापूर्वी प्रभावित वापरकर्त्यांना सूचना देऊ.

माहिती सुरक्षा

आम्‍ही Google चे संरक्षण करण्‍यासाठी आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे अनधिकृत वापरापासून किंवा आमच्‍याकडे असलेल्‍या माहितीचा अनधिकृत बदलांपासून, तिला जाहीर करण्‍यापासून किंवा नाश करण्‍यापासून संरक्षण करण्‍यासाठी कठोर परिश्रम करतो. विशेषत:

अनुप्रयोग

Google Inc. व त्यांचे संबंधितकडून देण्‍यात येणार्‍या सर्व सेवा तसेच इतर साइटवर दिल्या जाणार्‍या सेवांसह त्यांचे संबंधित (जसे की आमच्या जाहिरात सेवा) यांच्यासह आमचे गोपनीयता धोरण सर्व सेवांना लागू होते, पण वेगळे गोपनीयता धोरण असलेल्या सेवा की ज्यामधे प्रस्तुत असलेल्या गोपनीयता धोरणांचा समावेश नाही अशा सेवा त्यात समाविष्‍ट होत नाहीत.

आमचे गोपनीयता धोरण इतर कंपन्यांकडून किंवा व्यक्तींकडून देण्यात येणार्‍या सेवांसह आपल्याला शोध परिणामात दाखविली जाणारी उत्पादने आणि साइट, Google सेवा समाविष्‍ट करु शकणार्‍या साइटस किंवा आमच्या सेवांमधून लिंक केलेल्या इतर साइटना लागू होत नाही. आमच्या गोपनीयता धोरणांमध्‍ये आमच्या सेवांची जाहिरात करणार्‍या आणि कुकीज, पिक्सल टॅग आणि इतर तंत्रज्ञान वापरु शकणार्‍या इतर कंपन्यांच्या आणि संस्‍थांच्या माहिती पद्धतींचा समावेश होत नाही.

अंमलबजावणी

आम्‍ही आमच्‍या गोपनीयता धोरणांच्या होणार्‍या पालनाचे नियमित पुनरावलोकन करतो. आम्‍ही अनेक स्‍वयं नियामक तरतुदिंच्या चौकटीतला ना धरून चालतो. जेव्हा आम्‍हाला व्‍यावहारिक लिखित तक्रारी प्राप्त होतील, तेव्‍हा आम्‍ही तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रार करणार्‍या व्‍यक्तीशी संपर्क साधू. आम्‍ही स्‍थानिक डेटा संरक्षण अधिकार्‍यांचा समावेश असलेल्‍या योग्‍य नियमन अधिकार्‍यांसह वैयक्तिक डेटाला हस्तांतरित करण्‍यासंबंधीच्‍या कोणत्याही तक्रारी ज्‍यांचे थेट आम्‍ही आमच्‍या वापरकर्त्यांसह निराकरण करू शकत नाही त्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी कार्य करतो.

बदल

आमचे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलू शकते. आपल्‍या स्‍पष्‍ट संमतीशिवाय आम्‍ही आपले अधिकार या गोपनीयता धोरणा अंतर्गत कमी करणार नाही. आम्‍ही या पृष्‍ठावरील कोणतेही गोपनीयता धोरण बदल पाठवू आणि बदल महत्वाचे असल्‍यास, आम्‍ही अधिक स्पष्टपणे सूचना प्रदान करू (काही सेवांसाठी, गोपनीयता धोरण बदलांच्‍या इमेल सूचना). आपल्‍या पुनरावलोकनासाठी आम्‍ही या गोपनीयता धोरणाच्‍या आधीच्‍या आवृत्‍या संग्रहामध्‍ये देखील ठेवू.

विशिष्‍ट उत्पादन पद्धती

खालील सूचनांमध्‍ये विशिष्‍ट Google उत्पादनांच्या बाबतीत विविक्षीत गोपनीयता पद्धतींचे विश्लेषण केले आहे जी उत्पादने आणि सेवा आपण वापरु शकता: