Google Maps अंतिम वापरकर्ता अतिरिक्त सेवा अटी
शेवटचे फेरबदल केले: ४ जून २०२५
Google Maps किंवा Google Maps Platform सेवा इंटिग्रेट करणारी कोणतीही तृतीय पक्ष उत्पादने अथवा सेवा वापरून, अंतिम वापरकर्ता म्हणून, तुम्ही (१) Google सेवा अटी, आणि (२) या Google Maps अतिरिक्त सेवा अटी (“Maps अतिरिक्त अटी”) स्वीकारणे आवश्यक आहे. Maps अतिरिक्त अटी यांमध्ये Google Maps/Google Earth आणि Google Maps/Google Earth APIs यांसाठी कायदेशीर नोटिस संदर्भाद्वारे समाविष्ट केलेल्या आहेत.
कृपया यांपैकी प्रत्येक दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. एकत्रितपणे, हे दस्तऐवज “अटी” म्हणून ओळखले जातात. ते आमच्या सेवा वापरताना तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे निश्चित करतात.
तुमचे Business Profile व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही Google Maps मधील फक्त व्यापाऱ्यांसाठी असलेली वैशिष्ट्ये वापरत असल्यास, https://support.google.com/business/answer/9292476 येथील Google Business Profile अटी लागू होतात.
आम्ही तुम्हाला आमचे गोपनीयता धोरण वाचण्यासाठी प्रोत्साहन देतो. आम्ही कोणती माहिती गोळा करतो, आम्ही ती का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट करणे आणि हटवणे कसे करू शकता हे स्पष्ट करते.
परवाना. तुम्ही या अटी यांचे पालन करता, तोपर्यंत Google सेवा अटी तुम्हाला Google Maps वापरण्याचा परवाना देतात, ज्यांमध्ये तुम्हाला पुढील गोष्टी करू देणारी वैशिष्ट्ये आहेत:
नकाशे पाहणे आणि त्यांवर भाष्य करणे;
KML फाइल आणि नकाशा स्तर तयार करणे; आणि
ऑनलाइन, व्हिडिओमध्ये आणि प्रिंटमध्ये योग्य ॲट्रिब्यूशनसह सार्वजनिकरीत्या आशय प्रदर्शित करणे.
तुम्हाला Google Maps वापरून ज्या विशिष्ट गोष्टी करण्याची परवानगी आहे त्यांबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया Google Maps, Google Earth आणि मार्ग दृश्य वापरणे परवानग्या पेज पहा.
निषिद्ध आचरण. तुमचे या अनुच्छेद २ चे पालन ही Google Maps वापरण्यासाठीच्या तुमच्या परवान्याची अट आहे. Google Maps वापरत असताना, तुम्ही पुढील गोष्टी करू नयेत (किंवा तुमच्या वतीने काम करणाऱ्या लोकांना त्या करण्याची अनुमती देऊ नये):
Google Maps च्या कोणत्याही भागाचे पुनर्वितरण करणे किंवा तो विकणे अथवा Google Maps वर आधारित नवीन उत्पादन किंवा सेवा तयार करणे;
आशय कॉपी करणे (तसे करण्यास तुम्हाला Google Maps, Google Earth आणि मार्ग दृश्य वापरणे परवानग्या पेज किंवा "वाजवी वापर" यासह लागू बौद्धिक संपदा कायदा यांद्वारे परवानगी दिलेली नसल्यास);
आशय मोठ्या प्रमाणावर डाउनलोड करणे किंवा त्याची बल्क फीड तयार करणे (अथवा इतर कोणालाही तसे करू देणे);
Google Maps चा पर्याय असलेल्या किंवा त्याच्याशी मोठ्या प्रमाणावर साम्य असलेल्या सेवेमध्ये वापरण्यासाठी इतर कोणताही मॅपिंगशी संबंधित डेटासेट तयार करण्याकरिता अथवा वाढवण्याकरिता (मॅपिंग किंवा नेव्हिगेशन डेटासेट, व्यवसाय सूची डेटाबेस, मेलिंग सूची अथवा टेलिमार्केटिंग सूची यांसह) Google Maps वापरणे किंवा
Android Auto सारख्या Google ने पुरवलेल्या विशिष्ट वैशिष्ट्याशिवाय रीअल-टाइम नेव्हिगेशन किंवा स्वायत्त वाहन नियंत्रण यासाठी किंवा त्यासंदर्भात इतर लोकांची उत्पादने अथवा सेवा यांसोबत Google Maps चा कोणताही भाग वापरणे.
वास्तविक स्थिती; जोखीम गृहीत धरणे. तुम्ही Google Maps नकाशा डेटा, रहदारी, दिशानिर्देश आणि इतर आशय वापरता, तेव्हा तुम्हाला वास्तविक स्थिती नकाशा परिणाम व आशय यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळू शकते, त्यामुळे तुमची स्वतंत्र निर्णयशक्ती वापरा आणि Google Maps तुमच्या स्वतःच्या जोखमीवर वापरा. तुमचे आचरण आणि त्याचे परिणाम यांसाठी नेहमी तुम्हीच जबाबदार असता.
Google Maps मधील तुमचा आशय. तुम्ही Google Maps मार्फत अपलोड, सबमिट, स्टोअर करत असलेला, पाठवत असलेला किंवा मिळवत असलेला आशय Google च्या सेवा अटी यांच्या अधीन आहे, ज्यामध्ये “तुमचा आशय वापरण्याची परवानगी” या नावाच्या विभागामधील परवान्याचा समावेश आहे. मात्र, तुमच्या डिव्हाइससाठी विशेषतः स्थानिक असणारा आशय (जसे की, स्थानिकरीत्या स्टोअर केलेली KML फाइल) Google वर अपलोड किंवा सबमिट केला जात नाही आणि म्हणून तो त्या परवान्याच्या अधीन नसतो.
सरकारी अंतिम वापरकर्ते. तुम्ही सरकारी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून Google Maps वापरत असल्यास, पुढील अटी लागू होतात:
शासकीय कायदा.
युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनमधील शहर किंवा राज्य सरकारी संस्थांसाठी, शासकीय कायदा व स्थळ यांच्याशी संबंधित Google सेवा अटी अनुच्छेद लागू होणार नाही.
युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारी संस्थांसाठी, शासकीय कायदा आणि स्थळ यांच्याशी संबंधित Google सेवा अटी अनुच्छेदाची जागा पुढील गोष्टीने घेतली आहे:
“कायद्यांमधील परस्परविरोधाचा संदर्भ न घेता या अटींचे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या कायद्याद्वारे संचालित केल्या जातील आणि त्यांनुसार त्यांचा अर्थ लावला जाईल व अंमलबजावणी केली जाईल. संपूर्णपणे फेडरल कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत: (अ) लागू फेडरल कायद्यांच्या अनुपस्थितीत कॅलिफोर्निया राज्याचे कायदे (कॅलिफोर्नियाचे कायद्यांमधील परस्परविरोधासंबंधी नियम वगळता) लागू होतील आणि (ब) या अटी किंवा Google Maps यातून उद्भवणार्या अथवा त्यासंदर्भातील कोणत्याही विवादाचे खटले फक्त सांता क्लारा काउंटी, कॅलिफोर्निया येथील फेडरल न्यायालयांमध्ये चालवले जातील व पक्षांची त्या न्यायालयांच्या वैयक्तिक अधिकारक्षेत्राला संमती असते.”
यू.एस. सरकारचे प्रतिबंधित अधिकार. युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारद्वारे किंवा त्यांच्यासाठी Google Maps चा सर्व अॅक्सेस अथवा वापर Google Maps/Google Earth कायदेशीर नोटिस यांमधील "यू.एस. सरकारचे प्रतिबंधित अधिकार" विभागाच्या अधीन आहे.