शेवटचे फेरबदल केलेले: ३० सप्टेंबर २०२५
Chrome किंवा ChromeOS वापरून, तुम्ही https://policies.google.com/terms येथे असलेल्या Google सेवा अटींना आणि या Google Chrome व ChromeOS अतिरिक्त सेवा अटींना सहमती दर्शवता.
या Google Chrome आणि ChromeOS अतिरिक्त सेवा अटी Chrome आणि ChromeOS यांच्या अंमलबजावणीक्षम कोड आवृत्त्यांना लागू होतात. Chrome साठी बहुतांश स्रोत कोड chrome://credits येथे मुक्त स्रोत परवाना करारनाम्याअंतर्गत विनाशुल्क उपलब्ध आहे.
Chrome आणि ChromeOS च्या ठरावीक घटकांचा तुमचा वापर पुढील अटींच्या अधीन आहे:
AVC
या उत्पादनाचा परवाना AVC पेटंट पोर्टफोलिओ परवान्याअंतर्गत ग्राहकाच्या वैयक्तिक वापरासाठी किंवा ज्यामध्ये (१) AVC मानकांचे पालन करून व्हिडिओ एंकोड करणे (“AVC व्हिडिओ”) आणि/किंवा (२) वैयक्तिक अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी असलेल्या ग्राहकाने एंकोड केलेला किंवा AVC व्हिडिओ पुरवण्यासाठी परवानाप्राप्त व्हिडिओ पुरवठादाराकडून मिळवलेला AVC व्हिडिओ डीकोड करणे यांसाठी मोबदला मिळत नाही अशा वापरासाठी दिला जातो. इतर कोणत्याही वापरासाठी परवाना दिला जात नाही किंवा तसे ध्वनित केले जाणार नाही. अतिरिक्त माहिती MPEG LA, L.L.C. कडून मिळवली जाऊ शकते. HTTPS://WWW.VIA-LA.COM पहा.